उज्ज्वला केळकर यांची प्रकाशीत पुस्तके

Sunday, November 9, 2008

आज मी बसून आहे, बायको जेवू घाले ना


आज मी बसून आहे, बायको जेवू घाले ना

राहिले तसेच काम, की भाकरी फुगे ना !

केरसुणी मी धरावी, नुसतेच तू बघावे !

मी काम करताना , रोजचेच तू नटावे !

ते काम का करावे, समजूनही कळे ना

दमलो अती श्रमाने, की पाय चालवेना !

ना घेतली विश्रांती, कामात व्यस्त आहे

घरातला नेहमी चा नोकर दूर राहे?

धुणे अटीतटीचे, घासता भांडी संपेना

चुकवीन बायकोला, ऐसी युक्ति मिळे ना !

की सूड घेई काळ, भलता च हा तुरुंग

देण्यास खोल घाव, छळण्यात गुढरंग ?

फसलो असा कसा हा, ते आजला कळेना ?

आज मी बसून आहे, बायको जेवू घाले ना

राहिले तसेच काम, की भाकरी फुगे ना !
---------------------------------------------
मुळ गाणे -
अजुनी रुसून आहे, खुलता कळी खुले ना

मिटले तसेच ओठ, की पाकळी हले ना !
समजूत मी करावी, म्हणुनीच तू रुसावे

मी हास सांगताच, रडताहि तू हसावे

ते आज का नसावे, समजावणी पटे ना

धरिला असा अबोला, की बोल बोलवेना !

का भावली मिठाची, अश्रूंत होत आहे

विरणार सागरी ह्या जाणून दूर राहे ?

चाले अटीतटीने, सुटता अढी सुटेना

मिटवील अंतराला, ऐसी मिठि जुटे ना !

की गूढ काहि डाव, वरचा न हा तरंग

घेण्यास खोल ठाव, बघण्यास अंतरंग ?

रुसवा असा कसा हा, ज्या आपले कळेना ?

अजुनी रुसून आहे, खुलता कळी खुले ना !


Friday, November 7, 2008

(चकणा )


उमाकांत काणेकर यांचे गीत असलेली , शोभा गुर्टू यांच्या आवाजातील एक अप्रतिम गझल ' उघड्या पुन्हा जहाल्या, जखमा उरातल्या ' याचे हे विडंबन त्यांची माफी


मिळता पुन्हा सगळा चकणा बशीतला
दिसती मम डोळ्यांना मदिरा पेल्यातल्या

घेऊ कशी नुसती घशात जळजळे
सुरवात करताना, चकल्या पुढातल्या

निघता वलय ओठी, हळुवार सिगारचे
मिळतात त्या अजुनी शेंगा भाजलेल्या

पिऊनिया उरावी, ती भुक लागलेली
तू विसरलास होत्या नोटा खिशातल्या

--------------------------------------------------------

मुळ गझल -
उघड्या पुन्हा जहाल्या, जखमा उरातल्या
फुलती तुझ्या स्मृतींच्या, कलिका मनातल्या

येऊ कशी निघोनी, पाऊल अडखळे
विरहात वेचिताना, घटना सुखातल्या
उठता तरंग देही, हळुवार भावनांचे
स्मरतात त्या अजूनी, भेटी वनातल्या

हासूनिया खुणावी, ती रात रंगलेली
तू मोजिल्यास होत्या, तारा


Monday, November 3, 2008

कणा - विडंबन

कवी कुसुमाग्रजांच्या कणा या कवितेचे
------------------------------------------

ओळखलस का देवा मला?'- स्वर्गात आला कोणी
शरीर होते सोडलेले, आत्म्याचीच वाणी
क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून :
पृथ्वीवरुन आत्ताच आलो. आलो स्फोटात मरुन;
रविवारच्या सुट्टीमध्ये बाजाराला गेलो
स्त्यावरच्या स्फोटाने धाडकन मेलो
नेते आले, पैसे दिले, सांत्वन थोडे केले,
सरणावर जळूनी जाता विसरुन सारे गेले.

कारभारणीला सोडून देवा इथे आता आलो आहे;
संपलेल्या स्वप्नांचा विचार सतत करतो आहे.

देवीकडे वळून पाहताच हसत हसत उठला
‘वर नको देवा, जरा एकटेपणा वाटला.

संपून गेले जीवन तरी सुटली नाही आशा
पाठीवरती हात ठेउन, फक्‍त शांती म्हणा’!

--------------------------------------------------------------------------

मुळ कविता-

‘ओळखलत का सर मला?’ - पावसात आला कोणी,
कपडे होते कर्दमलेले, केसांवरती पाणी.
क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून :
‘गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहुन’.
माहेरवाशीण पोरीसारखी चार भिंतीत नाचली,
मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली.
भिंत खचली, चूल विझली, होते नव्हते नेले,
प्रसाद म्हणून पापण्यांवरती पाणी थोडे ठेवले.
कारभारणीला घेउन संगे सर आता लढतो आहे
पडकी भिंत बांधतो आहे, चिखलगाळ काढतो आहे,
खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला
‘पैसे नकोत सर, जरा एकटेपणा वाटला.
मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा
पाठीवरती हात ठेउन, फक्‍त लढ म्हणा’!