(सदैव माणसा, पुढेच जायचे )
चाल :सदैव सैनिका, पुढेच जायचे
------------------------------------------------
सदैव माणसा, पुढेच जायचे
भविष्य ना पुन्हा कधी बघायचे
सदा तुझ्यापुढे, असे महा दशा
सदैव फसवी टॅरोट्ची दिशा
हळूच ग्रह हे,राशीस ग्रासती
मधेच या नाडी, निर्गाठ मारती
बारा जागेतुनी, हळूच जायचे
प्रलोभने तुला हे स्वामी दाविती
ही जन्मकुंडली तूलाच बाधिती,
मंगळ, शनी हा तुला न थांबवी
न चंद्र ग्रहणे, आयुष्य घडवी
न भविष्य तुझे, असे घडायचे
सदैव माणसा, पुढेच जायचे
भविष्य ना पुन्हा कधी बघायचे
---------------------------------------------------------
मुळ गाणे -
सदैव सैनिका, पुढेच जायचे
न मागुती तुवा, कधी फिरायचे
सदा तुझ्यापुढे, उभी असे निशा
सदैव काजळी, दिसायच्या दिशा
मधून मेघ हे, नभास ग्रासती
मधेच या विजा, भयाण हासती
दहा दिशांतुनी, तुफान व्हायचे
प्रलोभने तुला, न लोभ दाविती
न मोहबंधने, पदांस बांधिती
विरोध क्रोध वा, तुला न थांबवी
न मोह भासतो, गजांत वैभवी
न दैन्यही तुझे, कधी सरायचे
गीत - वसंत बापट
संगीत - वसंत देसाई
skip to main |
skip to sidebar
डॉ श्रीराम ठाकुर दादा स्मृति संस्कारधानी सन्मान
कविता संग्रह
कथा, कविता, लघुकथा,अनुवादित कथा, विडंबने यांचा मेळावा
About Me
Labels
Blog Archive
-
▼
2008
(22)
-
▼
September
(17)
- सिनेमातल्या हिरोंची पूर्वी भरली सभा
- अटी मान्य केला सर्व ह्या
- 'माथा' फिरे कुणाचा, आक्रंदतात कोणी
- नेहमीच राजे तुमची घाई
- सदैव माणसा, पुढेच जायचे
- दिवस असे हे ढकलायचे रडत रखडत जगायचे
- जेव्हा पुरी नि भाजी ताटात ही पडाली
- जाता दुरदेशी सुख वाटे जीवा!
- छंदात छंद तो प्रवासछंद, फिरण्या मन हे उल्हासिते
- हात नका लावुं कोणी फंडाला
- ऍडमिशन मिळे आता, डोनेशन घेता
- ही पाल तुरुतुरु, चढी भिंतीवरती हळु
- आयपीएल चा खेळ रे
- येशील येशील येशील गाडी
- रोज वाढते महागाई।!
- आकाशाशी जडले नाते
- सांगा ढेकुण कुणी हा पाहिला
-
▼
September
(17)
हे ब्लॉग पाहिलेत का ?
म.प्र. लघुकथाकार परिषद पुरस्कार
डॉ श्रीराम ठाकुर दादा स्मृति संस्कारधानी सन्मान
बालसाहित्याच्या प्रांगणात
संवेदना
गरगर गिरकी
फुल पर्यांच्या गोष्टी भाग १
गोष्ट वादळ देवाची
चंद्र पालखीची वाट
कविता संग्रह
----------------------------
अनमोल बक्षीस
'तुका म्हणे' साहित्य पुरस्कार
आकाशवृक्षाचे फूल
द. म. साहित्य सभा, कोल्हापूर
1
त्रिधारा
संघर्ष
5
सांजधून
आम्हीही माणसचं
3
2
सौ. उज्ज्वला केळकर यांची काही प्रकाशीत पुस्तके
----
0 comments:
Post a Comment