skip to main |
skip to sidebar
मुंबैच्या दर्यामंदी जहाज बुडू जातं
खुपते दृश्य सारं, किनारा पाहुनी
कोळंबी,बांगडा धोक्यात जीवं येतं
बुडली फुटली, बुडली फुटली बुडली गं !
नावेची सागरात, जोरात धडक होई
एमेसी चित्रा हंसा, बुडूनी त्यात जाई
'रेसक्यू ऑप्रेशन' नेहमीच फेल होतं
बुडली फुटली, बुडली फुटली बुडली गं !
फसतो कोळीराया, नियम आड येतं
वल्हवू नौका कशी, सागरी पिक जातं
पुनवेचा सण येतो, उदास मनं होतं
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
मुळ गाणे -
माळ्याच्या मळ्यामंदी पाटाचं पानी जातं
गुलाब, जाई, जुई, मोगरा फुलवीतं
दादाच्या मळ्यामंदी, मोटंचं मोटं पानी
पाजिते रान सारं, मायेची वयनी
हसत डुलत, मोत्याचं पीक येतं
गुलाब, जाई, जुई, मोगरा फुलवीतं
गडनी, सजनी, गडनी सजनी गडनी गं
सावळा बंधूराया, साजिरी वयनी बाई
गोजिरी शिरपा हंसा, माहेरी माज्या हाई
वाटेनं माहेराच्या धावत मन जातं
गुलाब, जाई, जुई, मोगरा फुलवीतं
गडनी, सजनी, गडनी सजनी गडनी गं
राबतो भाऊराया, मातीचं झालं सोनं
नजर काढू कशी, जीवाचं लिंबलोनं
मायेला पूर येतो, पारुचं मन गातं
गुलाब, जाई, जुई, मोगरा फुलवीतं
त्यांचे अभिनंदन

त्रिधारा - सर्व स्तरातील स्त्री- पुरुषांच्या तरल भावना, त्यांची सत्त्व जपण्याची धडपड आणि दु:खाशी केलेला झगडा नेमकेपणाने दाखविणार्या तीन हिंदी साहित्यिकांच्या वैविध्यपूर्ण कथांचा अनोखा संगम :
सौ. उज्ज्वला केळकर यांनी अनुवादित केलेला त्रिधारा हा कथासंग्रह मोहनलाल गुप्ता, सरला अग्रवाल आणि कमल चोपडा या तीन समकालीन हिंदी कथा लेखकांच्या कथांचा संग्रह आहे. मेहता पब्लिकेशने हे पुस्तक प्रकाशित केले आहे.
अरे.....माझ्या हाताला इतक्या वेदना का होताहेत ? आणि इतकं रक्तं.... अरे...अरे...मिस्टर द्रोणनाथन, आपण इतके
निर्दयी कसे होऊ शकता ? आपण माझा अंगठा का कापलात ?
वेदनेने कळवळत एकलव्य जागा झाला. त्याने आपला उजवा हात चाचपडला. आपला अंगठा सुरक्षित पाहून त्याने
सुटकेचा निश्वास सोडला. त्याला वाटलं, आपल्याला पडलेलं हे भीतीदायक स्वप्नं आपल्याला जीवनात होणा-या दुःख
वेदनेचा आरसा तर नसेल ? तो मनातल्या मनात म्हणाला, " हे दुःख या वेदना किती काळ माझ्याजवळ रहाणार,
कुणास ठाऊक ? " तो उठून आपल्या खोलीला लागून असलेल्या बाल्कनीत गेला. बाहेरचं मोकळं आकाश पाहून त्याने
आपले दोन्ही हात पसरले आणि करुणा भाकली. " परमेश्वरा, तू माझी असहाय्यता किती काळपर्यंत अशी नुसतीच बघत
बसणार ? नुसताच बघत रहाशील, की कधी खालीही येशील ?...."
एवढ्यात त्याने खिडकीतून खाली पाहिलं, तेव्हा त्याला दिसलं, सोसायटीच्या पार्किंगमध्ये सामानाने भरलेला
एक टेम्पो येऊन उभा रहिलाय. तो उत्सुकतेने खाली गेला. खाली येताच त्याला दिसलं, की टेम्पोच्या मागे एक रिक्षा
उभी आहे. रिक्षातून जवळ जवळ सहा फूट उंचीचा, आकर्षक व्यक्तिमत्वाचा एक माणूस खाली उतरला. त्याने जीन्स आणि
पांढ-या रंगाचा कुडता घातला होता. या साध्या वेशातही त्याचं व्यक्तिमत्व तेजस्वी आणि असामान्य असं प्रतीत होत
होतं. एकलव्याला वाटलं, टी. व्ही.वरील महाभारताच्या सिरियलमधून कुणा दिव्य पुरुषाचं आगमन झालय, कारण
त्याच्या प्रसन्न मुखमुद्रेवर दिव्यत्वाची आभा झळकत होती. त्या अपरिचित माणसाचं दिव्य रूप पहून एकलव्याच्या
मनात खुशीची लहर निर्माण झाली. एकलव्याला त्यावेळी माहीत नव्हतं, की ईश्वराने त्याची प्रार्थना किती लवकर
ऐकली. एकलव्याच्या मनात त्या नव्या माणसाची ऒळख करून घेण्याची उत्सुकता निर्माण झाली. त्या माणसाच्या
जवळ जाऊन एकलव्याने विचारले, " आपल्याला या पूर्वी कधीच पाहिलं नव्हतं. आपण नव्याने या बिल्डिंगमध्ये
रहाण्यासाठी आला आहात का ? "
आपल्या बिल्डिंगच्या वरच्या मजल्यावरचा एक फ्लॅट रिकामा आहे, हे एकलव्याला माहीत होते.
" होय आणि नाहीही ! " तो अपरिचित माणूस गंभीरपणे म्हणाला.
त्या माणसाचं असं गोंधळात टाकणारं उत्तर ऐकून एकलव्य विचारात पडला. त्याला अशा उत्तराची अपेक्षा नव्हती.
होय पण... आणि नाही पण.... याचा अर्थ काय ? काही वेळ गप्प बसून, काहीशा साशंकतेने तो त्या नव्या व्यक्तिला
न्याहाळू लागला. आपल्या प्रश्नाचं खरं खुरं उत्तर मिळवण्याच्या प्रयत्नात पुढे म्हणाला, " ते कसं काय ? "
" हा फ्लॅट माझ्या मित्राचा आहे. फ्लॅटबाबत कोर्टात केस चालू आहे. कोर्टाचा निर्णय माझ्या मित्राच्या बाजूने लागला,
तर मी इथे राहीन.... नाही तर मी इथून दुसरीकडे कुठे तरी निघून जाईन ! " त्या माणसाने आपल्या पहिल्या उत्तराचं
रहस्य उलगडलं.
एकलव्याने सगळं नीट समजल्यासारखी होकारार्थी मान हलवली. " अच्छा.... असं आहे तर... आपल्याकडे पुष्कळ
सामान दिसतय. आपलं सामान वर नेण्यासाठी मी आपल्याला मदत करू का ? "
एकलव्याला माहीत नव्हतं, की त्याचं आणखी एक उत्तर त्याला पुन्हा कोड्यात टकणार आहे.
" जरूर ! " त्या माणसाचं हे दुसरं उत्तर. पण तो एवढच बोलून थांबला नाही. तो पुढे म्हणाला, " तुम्ही माझी मदत
करू शकता पण.... "
" पण काय ? "
" जर तुम्ही स्वतःची मदत करू शकत असाल तर....."
" म्हणजे याचा अर्थ काय ? " एकलव्याने चमकून विचारले.
" स्वतःची मदत करणाराच माणूस खूश, आनंदी राहू शकतो आणि आनंदी, खूश असलेल्या लोकांनीच केलेली
मदत मी स्वीकारतो...."
त्या अपरिचित माणसाची अट ऐकून एकलव्याला थोडी लाज वटली. मिस्टर द्रोणनाथनचा चेहरा त्याच्यासमोर
साकार झाला. द्रोणनाथन त्याच्या बॉसचं नाव. त्यांचे शब्द एकलव्याला आत्ताही ऐकू येत होते....." आपलं ड्रॉईंग मला
पसंत पडलय. आपण कुशल आहात, पण आपल्या कौशल्याचा उपयोग आम्ही पुढ्च्या प्रोजेक्टमध्ये करून घेऊ.
नाराज होण्याचं कारण नाही. "
ऑफीसमधील ही घटना आठवून एकलव्य काही काळगप्प झाला. मग काहीशा खजील स्वरात म्हणाला, " मी
यावेळी दुःखी आहे, पण अपल्याला मदत करण्यात मला आनंदच वाटेल. "
" मग तर तू माझी मदत करच ! पण त्यापूर्वी माझा एक छोटा विनोद ऐक. " त्या नव्या माणसाने पहिल्या
सारख्याच गंभीरपणे म्हंटलं. आता एकलव्याला धीर आला. एकलव्याला त्याच्या बोलण्यातून असं मुळीच जाणवलं
नाही, की तो थट्टा करतोय. तो विचार करू लागला, याचा चेहरा- मोहरा तेजस्वी आणि आनंदी दिसतोय, पण काही
विचारलं तर विलक्षणच उत्तर देतोय. मग त्याला वाटलं, जिथं इतका वेळपर्यंत त्याला सहन केलं, तिथं आणखी थोडा
वेळ....असा विचार करून त्याने त्याचा विनोद ऐकण्यासाठी होकार भरला.
" काय ऐकतोयस ना ? " त्या माणसाने आपलं हसू लपवत विचारलं.
" अं.....हो ! "
" दोघे मित्र आपापसात गप्पा मारत आपल्याच नादात रस्त्यातून चालले होते. पहिल्या मित्राने तक्रार करत
दुस-या मित्राला म्हंटलं, " तू हा चष्मा का वापरतोस ? तू हा चष्मा लावतोस, तेव्हा तू मला अगदी घुबडासारखा दिसतोस."
पहिल्या मित्राच्या प्रश्नाचं शांतपणे उत्तर देत दुसरा मित्र म्हणाला," जेव्हा मी चष्मा वापरत नाही, तेव्हा तू मला
घुबडासारखा दिसतोस. "
विनोद ऐकून आणि त्याच्या, तो सांगण्याच्या शैलीने, एकलव्य खो खो हसू लागला. एकलव्याला मनमोकळं
हसताना बघून त्या नव्या माणसाने खोडकरपणे म्हंटलं, " आता तू काहीसा माझी मदत करण्याच्या लायकीचा झाला
आहेस. "
" याचा अर्थ काय ? "
नव्या माणसाने एकलव्याच्या प्रश्नाचे उत्तर न देता दुसरा विनोद सांगायला सुरुवात केली. " एका मित्राने आपल्या
दुस-या खेडवळ मित्राला विचारलं, " गांधीजयंतीबद्दल तुला काय माहिती आहे ? " तेव्हा तो खेडवळ मित्र म्हणाला,
गांधीजी एक महान पुरुष होते, पण जयंती कोण होती, हे नाही माहीत मला !
एकलव्य कोड्यात पडल्यासारखा हसू लागला. त्याला कळेना, की त्याने हसतच रहावं, की तिथून निघून जावं ?
तेवढ्यात त्याला त्या माणसाचे शब्द ऐकू आले, " उभा का राहिलाहेस ? चल माझी मदत कर ! "
एकलव्याने त्या माणसाचं सामान उचललं आणि बिल्डिंगकडे निघाला.
" आता तू माझी मदत करू शकतोस, कारण आता तू खूश आहेस. "
" आपण नेहमी असंच करता ? " एकलव्याने सामान्य स्थितीत येत विचारले.
" हो ! मी नेहमी खूश असणा-या लोकांकडूनच मदत घेतो. जर ते खूश नसतील, तर प्रथम त्यांना खूश करतो,
कारण खूश, आनंदी असणारा माणूसच कुणाचीही योग्य त-हेने मदत करू शकतो. आपल्या दुःखात चूर असणार्या
माणसाची योग्य त-हेने मदत करण्याची कुवत नसते. "
नव्या माणसाचं हे बोलणं एकलव्याच्या बुद्धीपेक्षा ह्रुदयाला स्पर्श करून गेलं. त्याने त्या अपरिचिताला लिफ्ट्द्वारे
वरच्या फ्लॅटपर्यंत पोचवले.
सामान घेऊन जाताना लिफ्टमध्येही दोघांचं बोलणं सुरूच होतं.
" माझं नाव एकलव्य. आपलं ? "
" माफ करा ! मी माझं नाव आणि काम दुस-याला सांगायला थोडा वेळ घेतो. "
" काही हरकत नाही. मी आपलं आपल्याला समजून घेण्यासाठी विचारलं. "
" एकलव्याला जाणून घेण्याचा तरी कधी प्रयत्न करतोस ? "
" अं... मला कळलं नाही." एकलव्य गडबडला. असा विलक्षण प्रश्न त्याला अगदी अनपेक्षित होता.
" काही नाही... मी अशीच गंमत केली.... चल माझ्या मित्राचा फ्लॅट आला. " लिफ्ट्मधून बाहेर पडत तो म्हणाला.
त्याने एकलव्याच्या मदतीने आपलं सामान फ्लॅटच्या दरवाजाशी ठेवलं आणि कुलूप काढलं. एकलव्याला वाटलं, तो
माणूस त्याला आत येण्याचं निमंत्रण देईल. पण तो अनोळखी माणूस अनोळखीच राहिला.
" एकलव्य, तुला भेटून आनंद झाला ! " एकलव्याला आत न बोलावताच त्याच्याशी हस्तांदोलन करून तो
अनोळखी माणूस म्हणाला आणि त्याला जाण्याचा हलकासा इशारा केला.
" मलाही आपल्याला भेटून अतिशय आनंद झाला. " एकलव्यानेही हात उंचावून त्याचा निरोप घेतला. या अनोळखी
माणसाच्या अनपेक्षित व्यवहाराने एकलव्य आचंबित झाला होता. " याने तर मला बाहेरूनच घालवून दिलं." एकलव्य
मनातल्या मनात बडबडला.
एकलव्याचा फ्लॅट या अनोळखी माणसाच्या फ्लॅटच्या बरोबर खाली होता. आपल्या फ्लॅटकडे परतताना
एकलव्याच्या मनात विचार आला, की या माणसाला अशा कही गोष्टी माहीत आहेत, की ज्यामुळे तो इतका आनंदी
आणि तेजस्वी दिसतोय, पण त्याने आपलं नाव का नाही सांगितलं ?
दुस-याला मदत करणं, एकलव्याच्या स्वभावातच होतं. त्या अपरिचित माणसाला मदत करून त्याला जो आनंद
होत होता, असा आनंद या पूर्वी त्याला कधीच झाला नव्हता. आनंद आणि आश्चर्य यांच्या संमिश्र भावनेने भारावून तो घरी परतला।
--------------------------------------------
उज्ज्वला केळ्कर यांच्या अगामी अनुवादित पुस्तक ' आपले लक्ष्य ' यातून साभार
एका अनावर ओढीने
ऐल पैल ओलांडत
सुसाटत, फुफाटत निघालेला
तुझा वेगवान प्रवाह
पालाण घालत
बेगुमान धडका देतोय
झाडाला
पण , त्याची मुळं आता
खुप खोलवर रुजलीयत.
विस्तारलीतसुध्दा...
तुझ्या आवेगाने
मुळातळीची माती सैलावेल
एखादी क्म्च हिरवी फांदीकी येईल
गळामिठी घालत
तुझ्यासोबत.
पण आता सारंच उन्मळून
तुझ्या प्रवाहावर झोकून देणं
कसं घडेल?
त्यापेक्षा तूच आवर ना तुझा आवेग
आणि
शांत समंजस होऊन वहात रहा
ऐल पैलाच्या मर्यादेत
काठांवरुन पानांचे हे स्नेहल डोळे
स्निग्धछाया धरतील तुझ्यावर
सदाचीच......
डॉ श्रीराम ठाकुर दादा स्मृति संस्कारधानी सन्मान
कविता संग्रह
कथा, कविता, लघुकथा,अनुवादित कथा, विडंबने यांचा मेळावा
उज्ज्वला केळकर यांची प्रकाशीत पुस्तके
Wednesday, April 18, 2012
Wednesday, August 10, 2011
( मुंबैच्या दर्यामंदी जहाज बुडू जातं )
( मुंबैच्या दर्यामंदी जहाज बुडू जातं )
चाल : माळ्याच्या मळ्यामंदी पाटाचं पानी जातं, गुलाब, जाई, जुई, मोगरा फुलवीतंमुंबैच्या दर्यामंदी जहाज बुडू जातं
कचरा, ग्रीस, तेल पसरे चौपाटीतं
मुंबैच्या दर्यामंदी साचले काळं पानी
खुपते दृश्य सारं, किनारा पाहुनी
कोळंबी,बांगडा धोक्यात जीवं येतं
कचरा, ग्रीस, तेल पसरे चौपाटीतं
बुडली फुटली, बुडली फुटली बुडली गं !
एमेसी चित्रा हंसा, बुडूनी त्यात जाई
'रेसक्यू ऑप्रेशन' नेहमीच फेल होतं
कचरा, ग्रीस, तेल पसरे चौपाटीतं
बुडली फुटली, बुडली फुटली बुडली गं !
फसतो कोळीराया, नियम आड येतं
वल्हवू नौका कशी, सागरी पिक जातं
पुनवेचा सण येतो, उदास मनं होतं
कचरा, ग्रीस, तेल पसरे चौपाटीतं
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
मुळ गाणे -
माळ्याच्या मळ्यामंदी पाटाचं पानी जातं
गुलाब, जाई, जुई, मोगरा फुलवीतं
दादाच्या मळ्यामंदी, मोटंचं मोटं पानी
पाजिते रान सारं, मायेची वयनी
हसत डुलत, मोत्याचं पीक येतं
गुलाब, जाई, जुई, मोगरा फुलवीतं
गडनी, सजनी, गडनी सजनी गडनी गं
सावळा बंधूराया, साजिरी वयनी बाई
गोजिरी शिरपा हंसा, माहेरी माज्या हाई
वाटेनं माहेराच्या धावत मन जातं
गुलाब, जाई, जुई, मोगरा फुलवीतं
गडनी, सजनी, गडनी सजनी गडनी गं
राबतो भाऊराया, मातीचं झालं सोनं
नजर काढू कशी, जीवाचं लिंबलोनं
मायेला पूर येतो, पारुचं मन गातं
गुलाब, जाई, जुई, मोगरा फुलवीतं
Friday, July 31, 2009
नॉट पेड शुभकामना आणि लोकशाही
नॉट पेड शुभकामना आणि लोकशाही
मूळ लेखक : हरिशंकर परसाई Harishankar Parsai
अनुवाद : उज्ज्वला केळकर Ujjwala Kelkar
नवीन वर्ष माझ्यासाठी शुभेच्छा असलेल्या भेटकार्डांचा नॉट पेड लिफाफा घेऊन अवतरलं. राजकारण्यांसाठी ते मतपेट्या घेऊन आलं होतं. दोन्हीही नॉट पेडच! मला शुभेच्छांचा स्वीकार करण्यासाठी दहा रुपये खर्च करावे लागले. राजकारण्यांना खूपच "नॉट पेड' चार्ज चुकवावा लागेल.माझ्या आसपास "लोकशाही वाचवा...प्रजातंत्र वाचवा...घटना वाचवा...' अशा घोषणा दिल्या जाताहेत. लोकशाही वाचवण्यासाठी इतके लोक उभे राहिले आहेत, की त्यामुळेच लोकशाही वाचणं मुश्कील वाटू लागलंय. लोकशाही वाचण्यापूर्वी पहिला प्रश्न मनात येतो, "कुणासाठी बरं वाचवायची ही लोकशाही?' लोकशाही वाचली आणि नुसतीच पडून राहिली, तर ती काय कामाची? परसातली भाजी मोकाट गुरा-ढोरांपासून वाचवायची ती कशासाठी? उभ्या उभ्या जळून जाण्यासाठी? नाही नाही, मुळीच नाही! भाजी राखणारा भाजी शिजवून खातो हे खरं! पण आता खाणारे इतके जास्त झालेत, की लोकशाहीच्या वाटणीसाठीच यापुढे भांडणं होत राहणार.तरीही एक प्रश्न उरतोच : लोकशाही वाचणार कशी? कोणतं इंजक्शन उपयुक्त ठरेल, परिणामकारक-प्रभावी ठरेल? सतत कुठली ना कुठली निवडणूक लढवणाऱ्या एका निवडणूकफेम नेत्याला मी म्हटलं, ""भाऊसाहेब, आईच्या पोटात शिरल्यापासून आपण राजकारणात आहात! सांगा ना, लोकशाही कशामुळे वाचेल? कुणी म्हणतं, समाजवादामुळे लोकशाही वाचेल. कुणी म्हणतं, समाजवादामुळे लोकशाही मरेल. कुणी म्हणतं, गरिबी हटल्याशिवाय प्रजातंत्र आणता येणार नाही. कुणी म्हणतं, गरिबी हटवणं म्हणजे हुकुमशाही आणणं. कुणी म्हणतं, अमुकतमुक नेताच लोकशाही वाचवू शकेल, तर दुसरं कुणी म्हणतं, तो नेता तर लोकशाही नष्ट करण्याच्या मागे लागलाय. आपण सांगा, लोकशाही कशी वाचेल?''भाऊसाहेब म्हणाले, ""या सगळ्या शंभर गोष्टींचं एक सूत्र मी तुला सांगतो.''""अं...ते कोणतं?'' मी भाविक चेहरा धारण करून ऐकू लागलो.""आपण वाचलो-की लोकशाही वाचेल. आपण जगलो- वाचलो तर दुनिया वाचेल. मी निवडून आलो तर मी नक्कीच लोकशाही वाचवेन...बरं, निघू मी? तिकिटासाठी प्रयत्न करायचेत...''मला वाटू लागलं, की आपणही निवडणूक लढवावी आणि लोकशाही वाचवावी. जेव्हा लोकशाहीची भाजी शिजेल तेव्हा आपल्याही वाटणीला एक प्लेट येईल. जे गेली कित्येक वर्षं लोकशाहीची भाजी खाताहेत ते म्हणताहेत, ""मोठी स्वादिष्ट लागते ही भाजी!'' लोकशाहीच्या भाजीला जी लोकांची साल चिकटली आहे ती सोलून टाका. मग त्या तंत्राला शिजवा. आदर्शांचा मसाला आणि कागदी कार्यक्रमांचं मीठ घाला. मग ही शिजलेली भाजी नोकरशाहीच्या चमच्याने खा. खाणारे म्हणतात, ""मोठी मजा येते!''फिल्मी चित्रतारे-तारका आणि देशातील पैलवान मंडळी लोकशाही वाचविण्यासाठी तत्पर आहेत. माझ्या मनात विचार येतो, मग मी मागे का राहावं? मी का वाचवू नये लोकशाही? पैलवानाला बदाम कुटता कुटता कुठली सवड मिळायला? चित्रतारे-तारकांना कुठल्या ना कुठल्या बॅग्राऊंड म्युझिकवर ओठ हलवावे लागतील, शारीरिक कवायत करावी लागेल. छे छे! माझ्याशिवाय लोकशाही वाचणं शक्य नाही.पण तेवढ्यात मला हा बिनतिकिटांचा लिफाफा दिसतो. मला आलेली भेटकार्डर्ं मी एका शेजारी एक लावून ठेवली. मग बघितलं, जवळजवळ पाच चौरस मीटर शुभकामना मला नव्या वर्षासाठी आल्या होत्या. इतकी कोरी कार्डं मला मिळाली असती तर ती मी विकून टाकली असती. पण त्या कार्डांवर माझं नाव आहे, म्हणून कोणी विकत घेणार नाही ती. नाव असलेली वस्तू विकत घ्यायला मी थोडाच चित्रतारा आहे? त्यांच्या अंडरवेअरसुद्धा लिलावात किती तरी अधिक किमतीत विकल्या जातात...तर सांगत काय होतो, दुसऱ्याच्या नावाची शुभकामना कुणाच्या कामाची?मी मांडलेल्या भेटकार्डांत ते विनातिकीट आलेलं भेटकार्डही आहे. कार्डावर माझ्या सुख-समृद्धीची कामना केलीय, ही गोष्ट खरी; पण ही शुभकामना स्वीकारण्यासाठी मला दहा रुपये द्यावे लागले. जी शुभकामना हाती येण्यासाठी मला दहा रुपये द्यावे लागले, ती काय माझं मंगल करणार? शुभचिंतक मला समृद्ध बघू इच्छितो, पण हे सांगण्यासाठी माझी संपदा-समृद्धी दहा रुपयांनी कमी करतो.शुभाची सुरुवात माझ्या बाबतीत नेहमी अशुभाने होते. समृद्धी येण्यासाठी हरियाणा, राजस्थानची लॉटरीची तिकिटं घेतली. पण कसलं काय न् कसलं काय! लॉटरी उघडली. त्यात माझा नंबर नव्हता. राजकारणातल्यांना कशी लॉटरी लागते? आपल्याला अशी समृद्धी नाही मिळायची. ती आडवाटेने ये-जा करते. लाजते. कुलवती आहे ना! पडदानशीनही आहे. माझ्या एका विद्यार्थ्याने ती आडवाट शोधूनही काढलीय. एक दिवस भेटला. विचारलं, ""मोठ्या थाटामाटात राहताना दिसतोस! चांगला भक्कम पैसा कमावतोस ना?''तो म्हणाला, ""सर, बिझनेस लाइन पकडलीय.''मी म्हटलं, ""अच्छा! कोणता बिझनेस करतोस?''तो म्हणाला, ""सट्टा खेळतो!''या देशात "सट्टा' बिझनेसमध्ये सामील झालाय. समुद्रमंथन करून "लक्ष्मी' वर काढण्यासाठी दानवांना आता देवांच्या मदतीची गरज नाही. पहिल्या समुद्रमंथनाच्या वेळी त्यांना टेक्निक माहीत नव्हतं, त्यामुळे देवांची मदत घ्यावी लागली. आता त्यांनी टेक्निक आत्मसात केलंय.माझ्या बाबतीत प्रत्येक चांगली गोष्ट "नॉट पेड' होते. मागच्या वर्षी स्वच्छता सप्ताहाचं उद्घाटन माझ्या घराजवळ झालं. "साइट' चांगली होती. तिथे कचऱ्याचा एक मोठा ढीग लावला गेला. फोटोग्राफर कोन आणि प्रकाश बघून गेला. जाताना मंत्रिमहोदयांनी कुठं उभं राहून फावडं चालवायचं ते निश्चित करून गेला. ऑफिसर कचऱ्याची सजावट करायच्या मागे लागले. एक दिवस मंत्रिमहोदय आले. तीन-चार फावडी चालवून त्यांनी सफाई सप्ताहाचं उद्घाटन केलं. त्यानंतर कुणीही त्या कचऱ्याच्या ढिगाकडे फिरकलंही नाही. दरवर्षी सफाई सप्ताहाचं उद्घाटन होईल. तीन-चार फावडी कचरा ढिगातून काढला जाईल... आणि या गतीने कचऱ्याचा ढीग सुमारे 100 वर्षांत साफ होईल. मला पेशन्स आहे. मी वाट बघू शकतो. पण या वर्षी दुसरीच जागा निवडली गेली.सफाई सप्ताह कचऱ्याचा ढीग देऊन जातो आणि नववर्ष "नॉट पेड शुभेच्छा!' तरीही मी संसदेत जायची मनीषा बाळगून आहे. एकदा एका सद्गृहस्थांना मी म्हटलं, ""यंदा मी निवडणूक लढवणार आहे.''ते म्हणाले, ""निवडणूक लढवून काय होणार?''मी म्हटलं, ""मी संसद सदस्य होईन.''ते म्हणाले, ""संसद सदस्य झाल्यामुळे काय होईल?''मी म्हटलं, ""मी मंत्री होईन.''ते म्हणाले, ""मंत्री झाल्यामुळे काय होईल?''मी म्हणालो,""मी मुख्यमंत्री होईन.''ते म्हणाले, ""मुख्यमंत्री झाल्यामुळे काय होईल?''मी म्हटलं, ""मी गरिबी हटवेन.''ते म्हणाले, ""गरिबी हटवल्यामुळे काय होईल?''मी म्हटलं, ""लोक सुखी होतील.''ते म्हणाले, ""पण भाऊ, लोक सुखी झाल्याने काय होईल?''याचं उत्तर माझ्याकडे नव्हतं. कसे झालेत हे भारतीय लोक! कसं झालंय त्यांचं मन! मग मला वाटलं, मलाच नाही, तर साऱ्या देशवासीयांना "नॉट पेड शुभकामना' येताहेत. आता त्यांची अशी अवस्था झालीय, की ते विचारताहेत, ""सुखी झाल्याने तरी काय होणार?''मित्र म्हणाले, ""तू निवडणूक लढवणार आहेस ना, मग तू जनतेचा उमेदवार हो. जनसमर्थित उमेदवार!''मी गेली कित्येक वर्षं या भारतीय जनाच्या शोधात आहे; पण तो सापडतच नाही. कुणी तरी म्हणालं, ""निवडणुकीच्या वेळी भेटतो हा भारतीय जन.'' आताच्या एका निवडणुकीत मी त्याला शोधू लागलो. जवळजवळ प्रत्येक पार्टीने मुसलमानांची मते मिळवण्यासाठी मौलवींना बोलावलं. मौलवीने फतवा काढला, "हे मुसलमानांनो, तुम्ही ईदच्या चंद्राबाबत माझं मत मानता. निवडणुकीच्या मतांबद्दलही माझं मत माना. माझं म्हणणं ऐका.' जैनांची मतं मिळवण्यासाठी अखिल भारतीय जैन नेत्याला बोलावलं. यातही दिगंबरांसाठी दिगंबर नेता, श्वेतांबरांसाठी श्वेतांबर नेता. स्थानकवासी आणि तेरापंथी नेते भेटले असते तर आणखीनच चांगलं झालं असतं. या क्षेत्रातील ब्राह्मणांना सांगितलं, ""इथून नेहमी ब्राह्मण निवडणूक जिंकत आलाय. गेल्या वीस वर्षांचं रेकॉर्ड आहे. जर या वेळी कुणी ब्राह्मणेतर निवडणूक जिंकला तर...तुमचा धिक्कार...धिक्कार तुम्हा ब्राह्मणांचा...!''कुठे आहे भारतीय जन? कुणासारखा आहे? "सुखीसंपन्न झाल्यामुळे काय होणार?' असं म्हणणारा तर तो जन नाही ना? की तो आहे भारतीय जन? तो रस्त्याने तर "भारतीय' होण्यासाठी चाललाय; पण कुणी तरी त्याला रोखून म्हणतंय, ""चल, परत फीर! तू भारतीय नाहीस! ब्राह्मण आहेस...जैन आहेस...तेली आहेस... नाभिक आहेस...मुसलमान आहेस...''"नॉट पेड' भेटकार्ड माझ्या डोळ्यांत वटारून पाहतं आणि म्हणतं, "काळाचा इशारा लक्षात घे आणि परत फीर!' तुझ्याकडून लोकशाही वाचणार नाही. निवडणूक जिंकून लोकशाही वाचवण्याचं काम नववर्षाला तुझ्याकडे सोपवायचं असतं तर माझ्यावर पूर्ण तिकीट चिकटलं नसतं का?''
-----------------------------------------------------------------------------------
उज्ज्वला केळकर176/2, "गायत्री', वसंतदादा साखर कामगारभवनजवळ, सांगली- 416416, फोन : 0233-2310020

Thursday, July 30, 2009
आडवाटेचा जमाना
आडवाटेचा ज़माना
मूळ लेखक : हरिशंकर परसाई Harishankar Parsai
अनुवाद : उज्ज्वला केळकर Ujjwala Kelkar
मी इमानदार बनण्याचा पुन्हा प्रयत्न केला, आणि पुन्हा अयशस्वी झालो. एकदा एक सद्गृहस्थ माझ्याकडे आले. माझ्या ओळखीच्या प्राध्यापकांना सांगून मी त्यांच्या मुलाचे मार्क वाढवावेत, अशी त्यांनी मला विनंती केली. एरवी मी त्यांचं काम केलं असतं. परंतु खूप दिवसांनंतर मला प्रामाणिकपणाची आठवण झाली होती आणि मी पूर्णपणे प्रामाणिक बनण्याची प्रतिज्ञा त्या काळात केली होती. त्या सद्गृहस्थांचं बोलणं ऐकून मला जुन्या कथा आठवल्या आणि मी विचार करू लागलो, की मी प्रतिज्ञा करतो न करतो तोच हे इंद्र किंवा विष्णू परीक्षा घेण्यासाठी इथे येऊन पोहोचले की काय? या काळात कुणी दीर्घकाळ तपश्चर्या करेल यावर त्यांचा विश्वास नाही. चार गोष्टी लिहून लोक युगप्रवर्तकांच्या यादीत आपलं नाव शोधू लागतात. त्यामुळे देवही आता तपश्चर्या सुरू होताच परीक्षा घेण्यासाठी येऊन पोहोचतात. मी त्यांना प्रणाम केला आणि प्रत्यक्षात म्हटलं, ""मी हे सगळं अनुचित आणि अनैतिक मानतो. मी हे काम करणार नाही.'' मला आशा होती, की ते आता आपल्या मूळ देवस्वरूपात प्रगट होतील आणि म्हणतील, ""बा वत्सा, तू परीक्षेत पूर्णपणे उतरला आहेस. बोल, तुला काय हवं? मी आत्ता वर देण्याच्या मूडमध्ये आहे. बोल, काय करू तुझ्यासाठी? हिंदी साहित्याच्या इतिहासात तुझ्यावर एक प्रकरण लिहिवून घेऊ? की कुणा समीक्षकाला तुझ्या घरी पाणी भरण्याची ड्यूटी लावू?''ते मूळ स्वरूपात आले; पण ते रूप मुळीच प्रसन्न नव्हतं, रोषपूर्ण होतं. ते बडबडत निघून गेले. मी ऐकलं, ते लोकांना माझ्याविषयी सांगत होते, ""आज-काल तो साला मोठा प्रामाणिक बनलाय!'' मी ज्यांना देव समजत होतो तो तर साधा माणूसच निघाला. मी माझ्या आत्म्याला विचारलं, ""हे माझ्या आत्म्या, तूच सांग, शिव्या खाऊन आणि बदनामी करून घेऊन मी इमानदार, प्रामाणिक बनून राहू?''आत्म्यानं उत्तर दिलं, ""नाही, तशी काही जरूर नाही. इतकी काय घाई आहे? पुढे काळ बदलेल, तेव्हा बन इमानदार नि प्रामाणिक!''माझा आत्मा कधी कधी योग्य रीतीने गुंत्याची उकल करतो. चांगला आत्मा फोल्डिंग खुर्चीसारखा असायला हवा. गरज लागली तर ती उघडून बसावं, नाही तर मिटवून ती कोपऱ्यात उभी करून ठेवावी. जेव्हा जेव्हा मला आत्मा अडवतो तेव्हा तेव्हा मला जुन्या कथांची आठवण होते. या जुन्या कथांमधील राक्षस आपला आत्मा दूरच्या पहाडावरील एखाद्या पोपटात का ठेवत होते? ते त्यापासून मुक्त होऊन बिनदिक्कतपणे राक्षसी काम करू शकत होते. देव आणि दानव यात अजूनही हाच फरक आहे. एकाचा आत्मा त्याच्याजवळच असतो आणि दुसऱ्याचा त्याच्यापासून दूर! मी अशी काही माणसं पाहिली आहेत, ज्यांच्यापैकी काहींनी आत्मा कुत्र्यात ठेवला आहे, काहींनी डुकरात. आता तर जनावरांनीही ही विद्या शिकून घेतलीय. काही कुत्री आणि डुकरं आपला आत्मा काही काही माणसांमध्ये ठेवतात. आत्मा म्हणाला, तेव्हा मी प्रामाणिक बनण्याचा इरादा सोडून दिला. राधेश्यामनेही असा प्रयत्न केला होता आणि तोही आपल्या प्रयत्नात अयशस्वी झाला होता. त्याचं एक छोटंसं दुकान होतं. त्याने विक्रीच्या पैशाचा अगदी खरा हिशोब ठेवला आणि तो विक्रीकराच्या कार्यालयात घेऊन गेला. तिथे त्याला सांगितलं गेलं, की हिशोब खोटा आहे. त्याला त्याचा खरा हिशोब खरा ठरवण्यासाठी लाच द्यावी लागली. खऱ्यासाठी लाच देण्यापेक्षा खोट्यासाठी लाच देणं केव्हाही चांगलंच ना? इतका महाग प्रामाणिकपणा आपल्या कुवतीच्या बाहेरचा आहे. यापेक्षा अप्रामाणिकपणा जास्त स्वस्त आहे. एक स्त्री नोकरीसाठी एका मोठ्या माणसाकडे चारित्र्याचं प्रमाणपत्र मागायला गेली. त्या मोठ्या माणसाने तिला प्रथम आपल्या शयनकक्षात घेऊन जाण्याची इच्छा प्रदर्शित केली नि मग सच्चारित्र्याचं प्रमाणपत्र द्यायचं ठरवलं. प्रथम देव माणसं बनून फसवत होते. आता माणसं देव बनून फसवतात. प्रत्येक सत्याच्या हातात खोट्याचं प्रमाणपत्र असलेलं दिसतं. प्रामाणिकपणाजवळ अप्रामाणिकपणाने केलेल्या शिफारशीची चिठ्ठी नसेल तर कुणी त्याला दोन पैशालासुद्धा विचारणार नाही. हाच सगळा विचार करून मी शिथिल झालो. आता मी मोकळेपणाने मार्क वाढवू शकतो. या दिवसांत मला खूप स्नेही भेटतात. वर्षातून एखाद-दुसऱ्या वेळीच ते मला पूर्वी भेटायचे. त्यांना आलेलं पाहताच ते कोणत्या कामासाठी आलेले आहेत ते माझ्या लक्षात येतं. मोसम पाहून मी येणाऱ्याचं काम काय आहे ते सांगू शकतो. जुलैच्या पहिल्या आठवड्यात जेव्हा मेघ दाटून आलेले असतात, धरतीने हिरवी ओढणी धारण केलेली असते, आसपास मोर-चातकांचे स्वर गुंजत असतात, निग्रो सुंदरीच्या दातांप्रमाणे वीज चमकत असते, अशा सुरेख समयी कुणी अनेक महिन्यांनंतर आलेलं पाहिलं की लक्षात येतं, की हे काही गीत गाण्यासाठी आलेले नाहीत, आपल्या मुलांना शाळेत घालण्यासाठी मदत मागायला आले आहेत. इकडे मार्चमध्ये जो येतो तो मार्क वाढवण्यासाठी किंवा पेपर आऊट करवण्यासाठी. खरी गोष्ट अशी आहे, की सगळ्या तुकड्यांची "सिलॅबस' आणि "प्रॉस्पेक्टस' चुकीची आहेत. त्यात जरूर असलेल्या अशा दोन कागदांचा उल्लेखच असत नाही. एक कागद सुरुवातीचा आणि एक कागद शेवटचा. पहिला कागद पेपर आऊट करण्याचा असतो आणि दुसरा मार्क वाढवण्याचा. जो या कागदांचा नीट अभ्यास करतो तो पास होतो. फर्स्टक्लाससुद्धा मिळवू शकतो. हे कागद म्हणजे प्रश्र्नपत्रिका. काही विद्यार्थी ती स्वत:च तयार करतात. ते प्रतिभावान असतात आणि त्यांचं भविष्य उज्ज्वल असतं. काहींचे पालक या प्रश्र्नपत्रिका तयार करतात. अशा दुसऱ्यांच्या तोंडाकडे पाहणाऱ्या विद्यार्थ्यांचं भवितव्य संदिग्ध असतं. त्यांच्यापेक्षा त्यांच्या पालकांचंच भविष्य बरं आहे, असं म्हणायला हवं. अध्यापकांशी माझा संबंध असल्यामुळे माझ्याकडे दोन्ही प्रकारचे लोक येतात. काल जे आले होते ते दोन वर्षांपूर्वी एका लग्नात मला पहिले आणि शेवटचे भेटले होते. त्या छोट्याशा परिचयातून माझ्याविषयी त्यांना एवढी आत्मीयता वाटू लागली होती, की भाऊ परीक्षेला बसला आहे, म्हटल्यावर त्यांना माझी आठवण सतावू लागली. विरहिणीला पाऊसकाळात आपल्या प्रियकराची आठवण सतावते, तसंच परीक्षेच्या मोसमात काही लोकांचा विरह जागा होतो आणि त्यांना काही विशेष परिचितांची आठवण सतावू लागते. ते सांगू लागले, ""अमुक प्रोफेसर आपले मित्र आहेत. त्यांनी प्रश्नपत्रिका काढलीय. काही हिंट द्यायला सांगा नं!'' मला वाटू लागलं, की एखाद्याशी मैत्री आहे, तर त्याचा एवढाच उपयोग आहे की काय, की जरुर पडेल तेव्हा त्याच्याकडून चुकीचं काम करून घ्यावं? कुणी असं म्हणत नाही, की अमक्यांशी आपली मैत्री आहे, तर त्यांना समजावा ना, की असं चुकीचं काम करू नका. किंवा कुणी असंही म्हणत नाही, की अमुक आपला शत्रू आहे, तर त्याच्याकडून पेपर आऊट करून घेऊन त्याचं इमान बिघडवा. नाही. शत्रू सगळे सुरक्षित आहेत. इमान नेहमी मित्रांचंच बिघडवलं जातं. या सगळ्या प्रश्र्नपत्रिका फोडा म्हणणाऱ्या आणि मार्क वाढवा म्हणणाऱ्या लोकांना हसताही येत नाही त्याची दया वाटते. हे अतिशय त्रासलेले आणि भयभीत झालेले लोक असतात. कुणाला वाटत असतं, की मुलगा पास झाला म्हणजे त्याला नोकरी लावता येईल. त्यामुळे कुटुंबाची दुर्दशा थोडी कमी होईल. कुणाला वाटतं, मुलगा नापास झाला तर त्याचा वर्षभराचा अभ्यासाचा खर्च कसा भागवायचा? कुणाला वाटत असतं, मुलगी पास झाली तर लग्न करून थोडंसं ओझं हलकं करता येईल. खूप दु:खी-कष्टी असतात हे लोक. यात काही लोक तर इतके दीन असतात, की वाटतं, आधी त्यांच्या गळ्यात पडून रडून घ्यावं. माझ्या वैतागाचं कारण दुसरंच आहे. हे लोक आता बेधडकपणे, नि:संकोचपणे, निर्लज्जपणे काम करू लागले आहेत. दहा वर्षांपूर्वीही मी हे काम करून देत होतो. मार्क वाढवून द्या म्हणणारे घाबरत, चाचरत, लाजत, संकोचत त्याबद्दल बोलायचे. लोक सहजपणे तसं बोलत नसत. त्या वेळी लपून-छपून अशी चिठ्ठी यायची- "आपला दोस्त रमेशचंद्रचा भाऊ सुरेशची मोटरसायकल बिघडली आहे. तिच्यावर इंग्रजीत 2431 नंबर लिहिलेला आहे. ती आपला मित्र सिन्हा यांच्याकडे दुरुस्तीसाठी गेली आहे. आपण अशा तऱ्हेने त्यात सुधारणा करा, की ती कमीत कमी 40 टक्के तरी काम देऊ शकेल.' याचा अर्थ असा, की सुरेशचा रोल नंबर 2431 आहे. त्याचा इंग्रजीचा पेपर बिघडलाय. सिन्हा पेपर तपासताहेत आणि त्यांच्याकडून 40 टक्के गुण देववायचे आहेत. आता सरळ सरळ चिठ्ठी येते. उघडं पत्रसुद्धा येतं. त्या वेळी गुण वाढवायला येणारे खूप वेळ संकोचाने बसून राहत, इकडच्या-तिकडच्या गोष्टी करत आणि नंतर शरमून बगला झाकत मार्क वाढवण्याबद्दल बोलत असत. आता मार्क वाढवायला येणारा अशा तऱ्हेने येतो, जसा काही बाजारात भाजी घ्यायला चाललाय! सरळ माझ्या डोळ्यांत पाहतो आणि अधिकारवाणीने सांगतो, की मार्क वाढवायचे आहेत. दहा वर्षांत ही जी काही प्रगती झाली आहे ती मला त्रास देते. अत्यंत संकोचहीनता झालीय. लोकांचं हे साहस मला घाबरवतं. मी वाट बघतो, की कुणी तरी थोडासा संकोच घेऊन येईल आणि मी आश्वस्त होईन. कोणी येत नाही. मला वाटतंय, आम्ही सगळ्यांनी हे मान्य केलंय, की साधारण असलेले सगळे रस्ते बंद झालेत. त्यावर पाटी टांगलीय : "रस्ते दुरुस्तीसाठी बंद आहेत.' वर्षानुवर्षं हे रस्ते बंद आहेत आणि सगळे आडवाटेने चाललेत. चालता चालता आडवाटेवरची झाडं-झुडपं, काटेकुटे साफ झालेत आणि या वाटा मोठ्या रस्त्यांसारख्याच गुळगुळीत आणि रुंद झाल्यात. अनवाणी लोक बेधडकपणे या वाटेवरून चाललेत. साधारण रस्त्याने जाणारा आता मूर्ख आणि वेडा समजला जाईल. आता साधारण रस्ते खुले झाले तरी लोक त्यावरून चालताना कचरतील. दुरुस्ती करणारेही याच कारणासाठी शिथिल झालेत. वहिवाटीत न आल्याने आता साधारण रस्त्यांवर झाडोरा, जंगली झाडं उगवतील आणि रस्ते झाकून जातील. त्या वेळी कुणालाही जाणवणार नाही, की या देशात साधारण रस्तेही आहेत. साधारण रस्ते आता भविष्यात पुरातत्त्ववेत्त्यांनाच मिळतील. तेच हे रस्ते शोधून काढतील. ते निष्कर्ष काढून सांगतील, की त्या काळात या देशात साधारण रस्ते होते, पण कुणी त्यावरून चालत नव्हतं. सगळे आडवाटेनेच जायचे. उपयोगात न आल्याने रस्ते दबून गेले. सफलतेच्या महालाचा समोरचा दरवाजा बंद झालाय. अनेक लोक आत घुसलेत आणि त्यांनी कडी लावून घेतलीय. ज्याला आत घुसायचंय तो नाकाला रुमाल लावून गटारीतून आत घुसतो. आसपास सुगंधित रुमालांची दुकानं लागलीत. लोक रुमाल खरेदी करून नाकाला लावून गटारीतून आत घुसताहेत. ज्यांना दुर्गंधी जास्त येते, जे फक्त मुख्य दरवाज्यातूनच आत जाऊ इच्छितात, ते दरवाज्याच्या बाहेर उभं राहून डोकं आपटताहेत आणि त्यांच्या कपाळातून रक्त वाहतंय.
----------------------------------------------------------------------------------

Wednesday, July 29, 2009
'त्रिधारा' पुस्तकास 'स्मिता पाटील' साहित्य पुरस्कार
दै. आपला खान्देश आणि जत्रा प्रकाशन यांच्या वतीने खान्देशकन्या स्मिता पाटील साहित्य पुरस्कार दिले जातात. यंदाचा अनुवादित पुस्तकांसाठीचा पुरस्कार या ब्लॉगच्या लेखिका सौ. उज्ज्वला केळकर यांना त्यांच्या त्रिधारा पुस्तकासाठी मिळाला आहे.
त्यांचे अभिनंदन

त्रिधारा - सर्व स्तरातील स्त्री- पुरुषांच्या तरल भावना, त्यांची सत्त्व जपण्याची धडपड आणि दु:खाशी केलेला झगडा नेमकेपणाने दाखविणार्या तीन हिंदी साहित्यिकांच्या वैविध्यपूर्ण कथांचा अनोखा संगम :
सौ. उज्ज्वला केळकर यांनी अनुवादित केलेला त्रिधारा हा कथासंग्रह मोहनलाल गुप्ता, सरला अग्रवाल आणि कमल चोपडा या तीन समकालीन हिंदी कथा लेखकांच्या कथांचा संग्रह आहे. मेहता पब्लिकेशने हे पुस्तक प्रकाशित केले आहे.
पुस्तका विषयी अधीक माहितीसाठी इथे भेट द्या
आपला
अमोल केळकर
अमोल केळकर
Sunday, July 26, 2009
२६ जुलै २००५ एक अनुभव !!
४ वर्ष झाली या गोष्टीला पण काही घटना आपण कधीच विसरु शकत नाही.
त्या दिवशी दुपारी वाशीतील ऑफिसमधे नेहमी प्रमाणे काम सुरु होते. बाहेर पाऊस चालुच होता. साधारणपणे ४ वा. काही कामानिमीत्याने छ्त्रपती शिवाजी टरर्मीनलला (छ. शि.ट) जायचे ठरले. ऑफिसमधुन बाहेर पडेपर्यंत पावसाचा अंदाज आला नाही परंतु वाशी रेल्वे स्थानकावर जाण्यासाठी रिक्षात बसल्यावर परिस्थीती समजायला लगली. पाऊस धो धो कोसळत होता.खरं म्हणजे पावसात प्रवास करण्याची आवड असणारा (अगदी लोकलचा प्रवासाचीही) मी त्या वेळी मात्र पावसाचा राग रंग पाहुन थोडासा साशंक होतो.
कदाचीत पुढील संकटांची चाहुल / धोक्याची जाणीव माणसाला होत असावी. माझी मनःस्थीती तशीच होती .परंतु त्याचे विश्लेशण करण्यास कदाचीत कमी पडलो असेन. किंवा नियतीच्या मनात काही वेगळाच विचार असेल.
वाशी रेल्वे स्थानकावर टिकीट काढण्यासाठी जेंव्हा रांगेत उभे राहिलो तेव्हा ठरवले की २ टिकीटे काढायची, एक छ. शि.ट( कामाचे ठिकाण) आणी दुसरे बेलापुर-कोकण भवन ( वास्तव्याचे ठिकाण). दोन्ही ठिकाणे बरोबर विरुध्द बाजुला. जी आधी लोकल येईल त्याने जायचे. बस्स !! इथेच चुकले.
आता वाटते की सारासार विचार करुन घरी जाण्याचा निर्णय घेतला असता तर बरे झाले असते. कारण बाहेर कोसळणारा मुसळधार पाऊस , थोड्या पावसातही मान टाकणारी मध्य रेल्वेची हार्बर (पनवेल-छ. शि.ट) सेवा, अशा प्रसंगी कुणीही घरी जाऊन मस्त कांदा भजी, मिसळ पाव खात बसला असता परंतू त्यावेळी मी मात्र छ. शि.ट का बेलापुर या विवंचनेत होतो. वाशी स्थानकावर जेव्हा दोन्ही बाजुचे इंडिकेटर पाहिले तेव्हा वाटले की चला आज लवकर घरी जण्याचा योग आहे बहुतेक कारण पनवेलला जाणारी लोकल ५ मिनीटे आधी येणार होती.पण तसे होणार नव्ह्ते.
" आपण जर एखाद्या निर्णया बाबत ठाम नसू किंवा द्विधा मनस्थितीत असू तर परिस्थितीला/नियतीला आपल्यावर भारी पडायला ५ मिनीटे खुप झाली". आणी तसेच झाले.
माझ्या दुर्दैवाने पनवेल लोकलच्या आधी छ. शि.ट ला जाणारी लोकल आली आणी अजिबात गर्दी नसलेल्या (तरीही लक्षात न घेता) त्या लोकल मधे माझ्यासकट चढ्लेल्या काही मोजक्या लोकांना(इतर लाखो लोकांबरोबर) नियती एक वेगळा अनुभव द्यायला सिध्द झाली होती.
प्रवासाची सुरुवात तर एकदम छान झाली. वाशी रेल्वे ब्रीज वरुन दिसणारे निसर्गाचे अप्रतीम सौंदर्य्, कधी नव्हे ते मिळालेली खिडकी जवळची जागा, आपण खरोखरच मुंबईत आहोत ना? असे वाटायला लावणारे हवामान. ही धुंदी फार वेळ टिकली नाही. जसजसे गोवंडी-चेंबुर जवळ यायला लागले तसा लोकलचा वेग मंदावला आणी सभोवतालचा अंधार आणखी गडद्द होत चालला असताना डोक्यात लक्खः प्रकाश पडला, आपण आता अडकणार.
गाडी जेंव्हा बराच वेळ चेंबुर आणी तिळकनगर स्थानकांच्यामधे थांबली तेंव्हा लक्षात आले की डाउन लाईनचे रुळ ( वाशी कडे जाणारे) पाण्यात मस्त डुंबत आहेत. याचा अर्थ अगदी स्पष्ट होता की त्यांची भावंडे ही पाण्यात मस्त डुंबत असणार (अप लाईनचे रुळ) आणी आमची लोकल पुढे जात नाही म्हणजे ती ही त्यांच्यात सामील असणार. परंतु त्यावेळेला मोटरमनच्या रुपाने परमेश्वर धाऊन आला आणी त्याने लोकल आणी रुळ यांचे भांडण होणार नाही हे पहात ( अगदी सुजाण पालकांसारखा) , अतीशय शिताफीने आमच्या लोकलला कुर्ला स्थानकावरच्या ८ नं. च्या प्लॅटफॉरमवर सुखरुप पोहचवले. कुठेतरी वाटेत अडकुन पडण्यापेक्षा हे थोडे बरे होते की निदान आता प्लॅटफॉरमवर होतो.
कुर्ला स्थानकावर १ नं. प्लॅटफॉरमवर ठाण्याला जाणारी आणखी एक गाडी उभी होती. सगळीकडे शब्दशः धबधब्यासारखे पाणी वहात होते. विचार केला की तासा दोन तासात पाऊसाचा जोर कमी होईल आणी रेल्वे सेवा जरी चालू झाली नाही तरी कुर्ल्याहुन(पूर्व) बसने जाता येईल. याच वेळी घरी मोबाईल वरुन सुखरुप असल्याचा ( सुखरुप अडकल्याचा) निरोप पाठवून बायकोला रात्री पर्यंत पोचेन असे कळवळे.
मुंबईच्या माणसाला तास दिड तास वेळ घालवणे फारसे अवघड नाही. लोकलमधे बसायला जागा असल्याने तशी काळजी नव्ह्ती. पावसापासुन बचाव करण्यासाठी आणी गाडीत जागा असल्याने प्लॅटफॉरमवरचे लोक गाडीत आसरा शोधू लागले आणी गाडीतही गर्दी वाढू लागली. सर्वांची चुळबुळ, घरी जाण्याची ओढ्,सहप्रवाशांपैकी कोण, कुठे आणी कसे जाणार किंवा कसे जाणे योग्य आहे याबाबत चर्चा सुरु झाली. त्यातच बाहेरुन आलेल्या प्रवाशांच्या वेळोवेळी मिळ्णा-या पावसाबद्दलच्या अपडेटमुळे ( ब्रे़कींग न्युज) निराशा वाढत गेली. अशा सर्व वातावणात साधारपणे ७ च्या सुमारास सगळीकडचे दिवे गेले आणी एकच हाहाकार उडाला. सर्वत्र अंधार, लोकांचा प्रचंड आरडाओरडा अशा परिस्थितीत बायका, लहान मुले , शाळेतील विद्यार्थी यांचे काय हाल झाले असतील याची कल्पनाच न केलेली बरी!
साधारण १० एक मिनिटात दोन्ही लोकलच्या मोटरमनने इमर्जन्सी दिवे( जे आपल्या झिरो बल्ब सारखे असतात) चालु केले आणी सर्वांच्या जिवातजीव आला. आता संपुर्ण कुर्ला स्थानकात १८ डब्यातील मिणमिणते दिवे ८ ते १० हजार लोकांना रात्रभर साथ देणार होते. एकाच जागी बसुन कंटाळा आल्याने शेजा-याला जागा धरायला सांगुन डब्याच्या बाहेर आलो. ६ आणी ७ नं प्लॅटफॉरम मधील पाण्याच्या पातळीने धोक्याची पातळी दाखवणा-या लाल रेषेला गिळंक्रीत करुन बहुदा बराच वेळ झाला होता.पावसाचा जोर वाढला होता. काहीजणांनी पुर्व, पश्चिम दिशेने बाहेर जाण्याचा प्रयत्न केला परंतु तो पर्यंत खुप उशीर झाला होता. दोन्ही ठिकाणी पाण्याने अवघ्या परिसराला मिठीत घेतले होते.
आता लक्षात आले की परतीचे सर्व मार्ग बंद झाले आहेत. आपल्याला पाऊस थांबेपर्यंत लोकल मधे बसुन रहाण्याशिवाय काही एक पर्याय नाही . एक वडापाव घेतला आणी निमुटपणे जागेवर येऊन बसलो. जनता अडचणीत असतानाही त्या स्टेशनवरच्या टपरीवाल्याने ( कदाचीत अमराठी मालकाने) नेहमीच्याच दराने सर्व पदार्थ विकले आणी शक्य असेतोपर्यंत आपली टपरी उघडी ठेवली याचे राहुन राहुन आश्चर्य वाटते आहे.
दुपारपासुनच्या सर्व घटना पुन्हा एकदा आठवल्या आणी आपण आयुष्यातला एक सगळ्यात चुकीचा निर्णय(घरी न जाण्याचा) घेतला आहे याची जाणीव झाली. आता ब-यापैकी सर्वांनी परिस्थिती स्विकारली आणी माझ्यासकत जो तो एक दुस-यांसी संवाद साधु लागला त्याचप्रमाणे घरी संपर्क करण्याचा अयशस्वी प्रयत्न करु लागला. मोबाईल बंद, बॅटरी संपत आलेली तरी ही प्रयत्न चालुच. घरी काय परिस्थीती असेल? पाणी घरात आले असेल का? बायको, मुले कुठे असतील हे सर्व प्रश्न सर्वाच्या चेह्-यावर दिसत होते. एकमेकांना धीर देत होते, उभ्या लोकाना काही वेळ जागा देणे, लहानांना सांभाळुन घेणे हे सगळीकडे चालु होते. ज्या लोकाना बसायला जागा नाही त्यांनी पादचारी पुलाचा आश्रय घेतला होता. साधारण ११ वाजता पावसाचे पाणी प्लॅटफॉरमवर यायला सुरुवात झाली आणी परत एकदा सर्वांचे धाबे दणाणले. आता पाणी लोकलमध्ये काय ते शिरायचे राहिले होते. पण ती अशक्य गोष्ट होती. लोकल मधे बसलो असलोतरी खिडकीतुन टपकणा-या पाण्याने ब-यापैकी भिजत होतो पण खिडकी बंद करणे शक्य नव्ह्ते. अशा सर्व परिस्थीतीत, पावसाच्या एक प्रकारच्या गंभीर निनादात केव्हा डुलकी लागली ते कळलच नाही.
सकाळचे ६ वाजेतो पर्यंत जागचा हललो नाही. थोडेसे दिसायला लागल्यावर मात्र आता काही तरी करायलाच पाहिजे असे ठरवले. खिशातील पैसे, मोबाईल इ. गोष्टी बॅगेत घातल्या आणी जागा सोडली. पावसाचा जोर रात्री पेक्षा थोडा कमी झाला होता. एक चहा घेतला आणी पादचारी पुलावर कुर्ला पुर्व जाण्यासाठी चढलो. जागोजागी लोक दाटीवाटीने बसले होते. पुलावरुन कुर्ला(पू) चे जे द्रुष्य पाहिले ते पाहुन मोठा धक्का बसला. सर्व परिसर जलमय झाला होता. स्टेशनबाहेर खांद्याएवढे पाणी होते. सभोवतालची दुकाने निम्मी बुडली होती. हळुहळु एक एक जण पाण्यात जायचे धाडस करत होता. मी ही हातातली बॅग डोक्यावर घेतली आणी सुमननगर( सायन-पनवेल मार्ग) कडे चालु लागलो. जसजसे पुढे जायला लागलो तस तसे पाण्याची पातळी वाढत होती आणी पाय उचलणे अवघड जात होते. कुर्ला बस डेपोच्या जरापुढेच पाणी खांद्याला लागले. डोक्यावरची बॅग सांभाळत बॅलेंस राखत रस्त्याच्या मधोमध चालणे म्हणजे मोठी कसरत वाटत होती.पावसाच्या त्या घाण पाण्यातुन चालणे अगदी जिवावर आले होते. सगळेजण एका पाठोपाठ रांगेत चालत होते. पुढे काही अंतरावर छोटा पुल होता. तिथे पाण्याल प्रचंड ओढ होती.सुदैवाने एकमेकांच्या सहकार्याने ते अंतर ही पार पडले आणी कसाबसा सुमननगरला आलो.
आता इथे पाणी फारसे नव्हते पण हायवेवर प्रचंड वाहतुककोंडी झाली होती.एक ही वाहन जागचे हालु शकत नव्ह्ते.तसेच चालत वाशीच्या दिशेने निघालो.आणी साधारण सकाळ्चे १० वाजता देवनार डेपोत पोहोचलो.
बेस्टने तेथुन वाशी साठी खास बसेस सोडल्या होत्या. अर्थाथ नंतर बेलापुरला पोचायला फारसा त्रास झाला नाही.
घरी पोचल्यावर बायकोलाही हायसे वाटले.जन्मभर न विसरणारा अनुभव यानिमीत्याने मिळाला.

Thursday, June 18, 2009
आपले लक्ष्य
अरे.....माझ्या हाताला इतक्या वेदना का होताहेत ? आणि इतकं रक्तं.... अरे...अरे...मिस्टर द्रोणनाथन, आपण इतके
निर्दयी कसे होऊ शकता ? आपण माझा अंगठा का कापलात ?
वेदनेने कळवळत एकलव्य जागा झाला. त्याने आपला उजवा हात चाचपडला. आपला अंगठा सुरक्षित पाहून त्याने
सुटकेचा निश्वास सोडला. त्याला वाटलं, आपल्याला पडलेलं हे भीतीदायक स्वप्नं आपल्याला जीवनात होणा-या दुःख
वेदनेचा आरसा तर नसेल ? तो मनातल्या मनात म्हणाला, " हे दुःख या वेदना किती काळ माझ्याजवळ रहाणार,
कुणास ठाऊक ? " तो उठून आपल्या खोलीला लागून असलेल्या बाल्कनीत गेला. बाहेरचं मोकळं आकाश पाहून त्याने
आपले दोन्ही हात पसरले आणि करुणा भाकली. " परमेश्वरा, तू माझी असहाय्यता किती काळपर्यंत अशी नुसतीच बघत
बसणार ? नुसताच बघत रहाशील, की कधी खालीही येशील ?...."
एवढ्यात त्याने खिडकीतून खाली पाहिलं, तेव्हा त्याला दिसलं, सोसायटीच्या पार्किंगमध्ये सामानाने भरलेला
एक टेम्पो येऊन उभा रहिलाय. तो उत्सुकतेने खाली गेला. खाली येताच त्याला दिसलं, की टेम्पोच्या मागे एक रिक्षा
उभी आहे. रिक्षातून जवळ जवळ सहा फूट उंचीचा, आकर्षक व्यक्तिमत्वाचा एक माणूस खाली उतरला. त्याने जीन्स आणि
पांढ-या रंगाचा कुडता घातला होता. या साध्या वेशातही त्याचं व्यक्तिमत्व तेजस्वी आणि असामान्य असं प्रतीत होत
होतं. एकलव्याला वाटलं, टी. व्ही.वरील महाभारताच्या सिरियलमधून कुणा दिव्य पुरुषाचं आगमन झालय, कारण
त्याच्या प्रसन्न मुखमुद्रेवर दिव्यत्वाची आभा झळकत होती. त्या अपरिचित माणसाचं दिव्य रूप पहून एकलव्याच्या
मनात खुशीची लहर निर्माण झाली. एकलव्याला त्यावेळी माहीत नव्हतं, की ईश्वराने त्याची प्रार्थना किती लवकर
ऐकली. एकलव्याच्या मनात त्या नव्या माणसाची ऒळख करून घेण्याची उत्सुकता निर्माण झाली. त्या माणसाच्या
जवळ जाऊन एकलव्याने विचारले, " आपल्याला या पूर्वी कधीच पाहिलं नव्हतं. आपण नव्याने या बिल्डिंगमध्ये
रहाण्यासाठी आला आहात का ? "
आपल्या बिल्डिंगच्या वरच्या मजल्यावरचा एक फ्लॅट रिकामा आहे, हे एकलव्याला माहीत होते.
" होय आणि नाहीही ! " तो अपरिचित माणूस गंभीरपणे म्हणाला.
त्या माणसाचं असं गोंधळात टाकणारं उत्तर ऐकून एकलव्य विचारात पडला. त्याला अशा उत्तराची अपेक्षा नव्हती.
होय पण... आणि नाही पण.... याचा अर्थ काय ? काही वेळ गप्प बसून, काहीशा साशंकतेने तो त्या नव्या व्यक्तिला
न्याहाळू लागला. आपल्या प्रश्नाचं खरं खुरं उत्तर मिळवण्याच्या प्रयत्नात पुढे म्हणाला, " ते कसं काय ? "
" हा फ्लॅट माझ्या मित्राचा आहे. फ्लॅटबाबत कोर्टात केस चालू आहे. कोर्टाचा निर्णय माझ्या मित्राच्या बाजूने लागला,
तर मी इथे राहीन.... नाही तर मी इथून दुसरीकडे कुठे तरी निघून जाईन ! " त्या माणसाने आपल्या पहिल्या उत्तराचं
रहस्य उलगडलं.
एकलव्याने सगळं नीट समजल्यासारखी होकारार्थी मान हलवली. " अच्छा.... असं आहे तर... आपल्याकडे पुष्कळ
सामान दिसतय. आपलं सामान वर नेण्यासाठी मी आपल्याला मदत करू का ? "
एकलव्याला माहीत नव्हतं, की त्याचं आणखी एक उत्तर त्याला पुन्हा कोड्यात टकणार आहे.
" जरूर ! " त्या माणसाचं हे दुसरं उत्तर. पण तो एवढच बोलून थांबला नाही. तो पुढे म्हणाला, " तुम्ही माझी मदत
करू शकता पण.... "
" पण काय ? "
" जर तुम्ही स्वतःची मदत करू शकत असाल तर....."
" म्हणजे याचा अर्थ काय ? " एकलव्याने चमकून विचारले.
" स्वतःची मदत करणाराच माणूस खूश, आनंदी राहू शकतो आणि आनंदी, खूश असलेल्या लोकांनीच केलेली
मदत मी स्वीकारतो...."
त्या अपरिचित माणसाची अट ऐकून एकलव्याला थोडी लाज वटली. मिस्टर द्रोणनाथनचा चेहरा त्याच्यासमोर
साकार झाला. द्रोणनाथन त्याच्या बॉसचं नाव. त्यांचे शब्द एकलव्याला आत्ताही ऐकू येत होते....." आपलं ड्रॉईंग मला
पसंत पडलय. आपण कुशल आहात, पण आपल्या कौशल्याचा उपयोग आम्ही पुढ्च्या प्रोजेक्टमध्ये करून घेऊ.
नाराज होण्याचं कारण नाही. "
ऑफीसमधील ही घटना आठवून एकलव्य काही काळगप्प झाला. मग काहीशा खजील स्वरात म्हणाला, " मी
यावेळी दुःखी आहे, पण अपल्याला मदत करण्यात मला आनंदच वाटेल. "
" मग तर तू माझी मदत करच ! पण त्यापूर्वी माझा एक छोटा विनोद ऐक. " त्या नव्या माणसाने पहिल्या
सारख्याच गंभीरपणे म्हंटलं. आता एकलव्याला धीर आला. एकलव्याला त्याच्या बोलण्यातून असं मुळीच जाणवलं
नाही, की तो थट्टा करतोय. तो विचार करू लागला, याचा चेहरा- मोहरा तेजस्वी आणि आनंदी दिसतोय, पण काही
विचारलं तर विलक्षणच उत्तर देतोय. मग त्याला वाटलं, जिथं इतका वेळपर्यंत त्याला सहन केलं, तिथं आणखी थोडा
वेळ....असा विचार करून त्याने त्याचा विनोद ऐकण्यासाठी होकार भरला.
" काय ऐकतोयस ना ? " त्या माणसाने आपलं हसू लपवत विचारलं.
" अं.....हो ! "
" दोघे मित्र आपापसात गप्पा मारत आपल्याच नादात रस्त्यातून चालले होते. पहिल्या मित्राने तक्रार करत
दुस-या मित्राला म्हंटलं, " तू हा चष्मा का वापरतोस ? तू हा चष्मा लावतोस, तेव्हा तू मला अगदी घुबडासारखा दिसतोस."
पहिल्या मित्राच्या प्रश्नाचं शांतपणे उत्तर देत दुसरा मित्र म्हणाला," जेव्हा मी चष्मा वापरत नाही, तेव्हा तू मला
घुबडासारखा दिसतोस. "
विनोद ऐकून आणि त्याच्या, तो सांगण्याच्या शैलीने, एकलव्य खो खो हसू लागला. एकलव्याला मनमोकळं
हसताना बघून त्या नव्या माणसाने खोडकरपणे म्हंटलं, " आता तू काहीसा माझी मदत करण्याच्या लायकीचा झाला
आहेस. "
" याचा अर्थ काय ? "
नव्या माणसाने एकलव्याच्या प्रश्नाचे उत्तर न देता दुसरा विनोद सांगायला सुरुवात केली. " एका मित्राने आपल्या
दुस-या खेडवळ मित्राला विचारलं, " गांधीजयंतीबद्दल तुला काय माहिती आहे ? " तेव्हा तो खेडवळ मित्र म्हणाला,
गांधीजी एक महान पुरुष होते, पण जयंती कोण होती, हे नाही माहीत मला !
एकलव्य कोड्यात पडल्यासारखा हसू लागला. त्याला कळेना, की त्याने हसतच रहावं, की तिथून निघून जावं ?
तेवढ्यात त्याला त्या माणसाचे शब्द ऐकू आले, " उभा का राहिलाहेस ? चल माझी मदत कर ! "
एकलव्याने त्या माणसाचं सामान उचललं आणि बिल्डिंगकडे निघाला.
" आता तू माझी मदत करू शकतोस, कारण आता तू खूश आहेस. "
" आपण नेहमी असंच करता ? " एकलव्याने सामान्य स्थितीत येत विचारले.
" हो ! मी नेहमी खूश असणा-या लोकांकडूनच मदत घेतो. जर ते खूश नसतील, तर प्रथम त्यांना खूश करतो,
कारण खूश, आनंदी असणारा माणूसच कुणाचीही योग्य त-हेने मदत करू शकतो. आपल्या दुःखात चूर असणार्या
माणसाची योग्य त-हेने मदत करण्याची कुवत नसते. "
नव्या माणसाचं हे बोलणं एकलव्याच्या बुद्धीपेक्षा ह्रुदयाला स्पर्श करून गेलं. त्याने त्या अपरिचिताला लिफ्ट्द्वारे
वरच्या फ्लॅटपर्यंत पोचवले.
सामान घेऊन जाताना लिफ्टमध्येही दोघांचं बोलणं सुरूच होतं.
" माझं नाव एकलव्य. आपलं ? "
" माफ करा ! मी माझं नाव आणि काम दुस-याला सांगायला थोडा वेळ घेतो. "
" काही हरकत नाही. मी आपलं आपल्याला समजून घेण्यासाठी विचारलं. "
" एकलव्याला जाणून घेण्याचा तरी कधी प्रयत्न करतोस ? "
" अं... मला कळलं नाही." एकलव्य गडबडला. असा विलक्षण प्रश्न त्याला अगदी अनपेक्षित होता.
" काही नाही... मी अशीच गंमत केली.... चल माझ्या मित्राचा फ्लॅट आला. " लिफ्ट्मधून बाहेर पडत तो म्हणाला.
त्याने एकलव्याच्या मदतीने आपलं सामान फ्लॅटच्या दरवाजाशी ठेवलं आणि कुलूप काढलं. एकलव्याला वाटलं, तो
माणूस त्याला आत येण्याचं निमंत्रण देईल. पण तो अनोळखी माणूस अनोळखीच राहिला.
" एकलव्य, तुला भेटून आनंद झाला ! " एकलव्याला आत न बोलावताच त्याच्याशी हस्तांदोलन करून तो
अनोळखी माणूस म्हणाला आणि त्याला जाण्याचा हलकासा इशारा केला.
" मलाही आपल्याला भेटून अतिशय आनंद झाला. " एकलव्यानेही हात उंचावून त्याचा निरोप घेतला. या अनोळखी
माणसाच्या अनपेक्षित व्यवहाराने एकलव्य आचंबित झाला होता. " याने तर मला बाहेरूनच घालवून दिलं." एकलव्य
मनातल्या मनात बडबडला.
एकलव्याचा फ्लॅट या अनोळखी माणसाच्या फ्लॅटच्या बरोबर खाली होता. आपल्या फ्लॅटकडे परतताना
एकलव्याच्या मनात विचार आला, की या माणसाला अशा कही गोष्टी माहीत आहेत, की ज्यामुळे तो इतका आनंदी
आणि तेजस्वी दिसतोय, पण त्याने आपलं नाव का नाही सांगितलं ?
दुस-याला मदत करणं, एकलव्याच्या स्वभावातच होतं. त्या अपरिचित माणसाला मदत करून त्याला जो आनंद
होत होता, असा आनंद या पूर्वी त्याला कधीच झाला नव्हता. आनंद आणि आश्चर्य यांच्या संमिश्र भावनेने भारावून तो घरी परतला।
--------------------------------------------
उज्ज्वला केळ्कर यांच्या अगामी अनुवादित पुस्तक ' आपले लक्ष्य ' यातून साभार
Saturday, June 13, 2009
दुहेरी फायदा
राष्ट्रपतीभवनातून एक वटहुकूम जारी करण्यात आला. या वटहुकूमाद्वारे सर्व लोकप्रतिनिधी आणि शासकीय कर्मचारी यांना भ्रष्टाचार प्रतिबंधक लस टोचून घेणे, अनिवार्य करण्यात आले. वर्तमानपत्रातून आवेदन दिलं गेलं. निविदा मागवण्यात आल्या. कमी किमतीच्या निविदेवर शिक्का मोर्तब करण्यात आलं. त्यांना ऑर्डर देण्यात आली.लसीचे शिशे आले. डॉक्टर आले.
या सगळ्या गोष्टी इतक्या झटपट घडल्या , की प्रथम कुणाला काही कळंलच नाही. शासकीय अखत्यारीतील कदाचित ही पहिलीच गोष्ट असेल, इतकी झटपट घडलेली ! पण हे जेंव्हा लक्षात आलं तेंव्हा, मंत्री-संत्री , सचीव -अधिकारी , चपरासी- कार्यकर्ते -अनुयायी, पैसे खाणारे -पैसे देणारे स्सरेच हादरुन गेले. सुन्न झाले.
' हं ! आता मंत्री होण्यात काय फायदा ? ' मंत्री फुसफुसले.
' आता काय फायदा सचिव होण्याचा ? ' सचिव म्हणाले.
' आता काय फायदा लाळ घोटण्याचा? ' कार्यकर्ते उद्गारले.
' आता काय फायदा शिपाई होण्यात ? ' शिपाई पुटपुटले.
इतक्यात डॉक्टर नॅपकिनने हात पुसत बाहेर आले.
' असे चेहरे पाडून का बसला आहात मंडळी ? ' त्यांनी विचारले.
' आपली करणी ...'
माझी करणी ? कसली ?
' असं वेड पांघरुन पेडगावला जाऊ नका डॉक्टर.... ही ही भ्रष्टाचारविरोधी लस ... आत्ता टोचली ती..'
' ओह ... तिचं टेन्शन घेऊ नका तुम्ही ... त्या लसीचा फारसा परिणाम होणार नाही !'
' ते कसं ? '
' त्या लसीत भेसळ केलेली आहे. कमी कोटेशन देऊन निविदा भरली होती ना ! '
'असं पण का? '
' दुहेरी फायदा ... कमी कोटेशनमुळे निविदा मंजूर झाली आणि आता आपण मंडळी माझ्या इमानदारीचा काही विचार करालच ना ? '
---------------------------------------------------------------------------------------------
लेखिका - सौ उज्ज्वला केळकर, सांगली

Friday, June 5, 2009
पुरस्कार
-----------------------------------------------------------------------------
पुलावरुन धडधड करत राजधानी एक्सप्रेस निघून गेली. रोजच्या प्रमाणेच आजही भिकू जागा झाला. तो पळत पळत गल्लीत असलेल्या सार्वजनिक नळावर गेला. हात, पाय, तोंड धुतलं. बायको मुलं अजून झोपलेली होती. त्याने समोरच्या हॉटेलातून चहा आणि गरमागरम भजी आणली आणि चहा बरोबर तो भजी खाऊ लागला. भज्यांचा खमंग वास बायको मुलांच्या नाकात शिरला, तशी ती उठली.
बायको बघत राहिली. मुलांनी हात, तोंड न धुताच कागदातून भजी ओढून खायला सुरवात केली होती.
भजी संपली अन भिकूचं लक्ष कागदाच्या तुकड्याकडे गेलं. 'अरे हा तर आपलाच फोटो..' भिकूच्या तोंडून अभावितपणे बाहेर पडलं. फोटोत तो आपल्या बायको- मुलांबरोबर बसला होता. शेजारी फाटक्या गोधडया, चिंध्यांची गाठोडी ठेवलेली होती. साडीच्या चिंध्या पांघरलेल्या बायकोचा फाटका पदर डोक्यावर होता. मुलं माकडाप्रमाणे दात विचकत होती. भटक्या जिवनाचा तो वास्तव फोटो होता.
भिकूने तो फोटो सगळ्यांना दाखवला. फोटोखाली लिहिलं होतं, 'पुलाखालचं घर' . प्रथम पुरस्कार ५००० रु. अजय शर्मा- मुंबई.
आता त्याला आठवलं. काही दिवसापूर्वी एक फोटोग्राफर तिथे आला होता. त्या सगळ्यांना निट न्याहळून बघितल्यावर , त्यांचा फोटो काढण्याची ईच्छा त्याने प्रदर्शीत केली. मुलं तर एकदम खुश झाली. त्याने सांगितल्या तशा पोझेस त्यांनी दिल्या. जाण्यापूर्वी फोटोग्राफरने भिकूच्या हातावर ५० रु. ठेवले. त्या दिवशी सगले आनंदात होते. त्या दिवशी सगळ्यांनी भज्यांबरोबर जिलबीही खाल्ली.
भिकू आता विचार करु लागला, ५००० रु। म्हणजे किती वेळा ५० रु?
----------------------------------------------------------------

Monday, June 1, 2009
पुतळा
------------------------------------------------------
' साहेब ...'
' बोल ...'
' शासनाच्या प्रत्तेक निर्णयाला विरोध करायचा हीच आपली पक्षीय नीती आहे ना ? '
' बरं ? मगं ? '
' मग मुख्यमंत्र्यांच्या नव्या घोषणेचं आपण स्वागत आणि समर्थन कसं केलत ? '
' कोणती घोषणा ? '
' तीच ... शहरातल्या मध्यवर्ती भागात त्या राजनेत्याचा पुतळा उभा करण्याची ?
आपण म्हणालात, की कुठल्या ही विधायक कार्यात आम्ही सत्याधार्यांच्या बाजूने राहू ! सत्ताधारी पक्षाला साथ देऊ ! '
' अरे मूर्खा , पुतळा उभा करण्यासाठी वर्गणी गोळा करावी लागेल .'
' बरोबर ! '
' या कामात आपण त्यांना मदत करु ! '
' का ? '
' म्हणजे वर्गणीचा काही भाग आपल्या खजिन्यात जाऊ शकेल !'
' हं ! हे ही बरोबर ! '
' पुतळा उभा केल्यानंतर कुणी ना कुणी, कधी ना कधी , पुतळयाची विटंबना करणारच ! '
' अं ...'
'...... आणि तसं नाही झालंच, तर आपण ती व्यवस्था करु ... काय?
' पण का ? '
' त्या निमित्याने शहरात दंगा होईल. जाळपोळ, लुटालुट होईल. मग काय, आपली चांदीच चांदी ... काय ?'
' खरंय साहेब ...'

Thursday, May 28, 2009
प्रवाह
एका अनावर ओढीने
ऐल पैल ओलांडत
सुसाटत, फुफाटत निघालेला
तुझा वेगवान प्रवाह
पालाण घालत
बेगुमान धडका देतोय
झाडाला
पण , त्याची मुळं आता
खुप खोलवर रुजलीयत.
विस्तारलीतसुध्दा...
तुझ्या आवेगाने
मुळातळीची माती सैलावेल
एखादी क्म्च हिरवी फांदीकी येईल
गळामिठी घालत
तुझ्यासोबत.
पण आता सारंच उन्मळून
तुझ्या प्रवाहावर झोकून देणं
कसं घडेल?
त्यापेक्षा तूच आवर ना तुझा आवेग
आणि
शांत समंजस होऊन वहात रहा
ऐल पैलाच्या मर्यादेत
काठांवरुन पानांचे हे स्नेहल डोळे
स्निग्धछाया धरतील तुझ्यावर
सदाचीच......
------------------------------------------
कवयित्री - सौ. उज्वला केळकर. - सांगली
कवयित्री - सौ. उज्वला केळकर. - सांगली
त्यावेळी
त्यावेळी
वाटलं होतं
आपण
एकमेकांना
अगदी अनुरुप
जसं
दोन देह
एक मन
दोन श्वास
एक जीवन.
पण
पुलाखालून
थोडं पाणी
वाहून गेलं
आणि लक्षात आलं
आपले फुलण्याचे रुतू वेगळे
तसेच , पानग्ळीचेही.
आता आपण कुरवाळतो.
स्वतंत्रपणे
पाखरांच्या स्मृती
आपल्या बहरानंतरच्या
आणि वाट पहातो
नव्या बहराची
आपल्या पानगळीनंतरच्या
----------------------------------------
कवयित्री - सौ. उज्वला केळकर. - सांगली
Saturday, May 23, 2009
तू अशी स्वप्नात माझ्या येऊ नको ग साजणी
तू अशी स्वप्नात माझ्या येऊ नको ग साजणी
कस्तुरीचा गंध उधळित नकोस जाऊ कामिनी !!धृ !!
तव तेजाच्या प्रकाश किरणी फूल मनाचे उमलून आले
मावळतीला मिटू नको ग सूर्यफूलांचा बहर घेऊनी !!
तुझ्या स्वराच्या हिंदोळ्यावर शब्द माझे बांधले मी
गीत ते आकाशवेडे गाऊ आपण दोघे मिळोनी !!
नेंणीवेच्या काठावरुनी बोलाविशी तू चंचले
बोलाविले गे मी तुला सत्यात अन् जागेपणी !!
कवयित्री - सौ। उज्वला केळकर। - सांगली
Wednesday, April 29, 2009
अरे याला कुणी मत देणार का मत ?
अरे याला कुणी मत देणार का मत ?

ह्या तुमच्या लोकानायाकाला
दिल्लीत राहून सेवा करणार्या
गरिबांच्या कैवार्याला
कुणी मत देणार का मत ?
खूप पक्ष सोडले
खूप पैसे लाटले
खूप काहीच्या काही केलं
आणि सत्तेतल्या राक्षसाला
सारखं भ्रष्टाचाराच व्यसन लागलं.
बिच्चार्या ह्या राक्षसाला
कुणी मत देणार का मत ?
खातं गेलं, घर गेलं,
रुबाब गेला,गाडी गेलीआता
मतदारसंघही बदलतोय
पाच वर्षात न दिसलेल्या
या भिकार्याला
कुणी मत देणार का मत ?
निष्ठेला टोपी घातली
सुखी माणसाची वाट लावली
मंदीतही उधारीच चालली
कामांची तर वाट लावली
स्वप्नातही खुर्ची पाहणार्या
ह्या सत्तापिपासुला
कुणी मत देणार का मत ?

----------------------------------------
पुर्व प्रसिध्दी मराठी संकेतस्थळ मिसळपाव.कॉम
Monday, December 22, 2008
(संपेल ना कधीही , हा खेळ दहशतीचा!! )
चाल : रात्रीस खेळ चाले, या गूढ चांदण्यांचा
-----------------------------------------
रात्रीत गेम झाला, वस्तीतल्या गुंडाचा!
संपेल ना कधीही , हा खेळ दहशतीचा!!
हा गुंड ना स्वयंभू, जामिन राहतो हा
दंग्यात माणसांच्या, जाळपोळ करतो हा
पोलीस होई साथी, हा दूत शासनाचा
संपेल ना कधीही , हा खेळ दहशतीचा!!
खंडणी मागती हा, बॉलीवुडला शाप
जे 'भाई' सांगती ते करती आपोआप
हसतात नशिबाला हा दोष जाणीवांचा!
संपेल ना कधीही , हा खेळ दहशतीचा
या लाजिर्या जिवाला, का खोकी दिलीत ?
असतील सर्व नोटा , चुपचाप या पेटीत
हरवेल नुर अपुल्या या धुंद जीवनाचा
संपेल ना कधीही , हा खेळ दहशतीचा !!
-----------------------------------------------------
मुळ गाणे -
रात्रीस खेळ चाले, या गूढ चांदण्यांचा
संपेल ना कधीही, हा खेळ सावल्यांचा
हा चंद्र ना स्वयंभू, रवी तेज वाहतो हा
ग्रहणात सावल्यांचा अभिशाप भोगतो हा
प्रीतीस होई साक्षी, हा दूत चांदण्यांचा
आभास सावली हा, असतो खरा प्रकाश
जे सत्य भासती ते, असती नितांत भास
हसतात सावलीला, हा दोष आंधळ्यांचा
या साजीऱ्या क्षणाला, का आसवे दिठीत
मिटतील सर्व शंका, उबदार या मिठीत
गवसेल सूर आपुल्या, या धुंद जीवनाचा
गीत - सुधीर मोघे
संगीत - पं. हृदयनाथ मंगेशकर
स्वर - महेंद्र कपूर
चित्रपट - हा खेळ सावल्यांचा (१९७६)

Tuesday, December 2, 2008
( जो नावडतो सर्वांना तोचि आवडे श्रेष्ठीला )
जो नावडतो सर्वांना तोचि आवडे श्रेष्ठीला
साद घालता दिसता कोणी, हात पक्षाचा जाई पळुनी
दु:ख राणेंचे पाही दुरुनी, होई आनंद विलासाला
घेउनि रामु अपुल्या साथी, रितेशही येता पाठी
सत्तेसाठी राष्ट्रवादी, आबा मुकती गृह खात्याला
अतिरेक्यांचे टळता संकट, देशमुख येई आता निघुन
जपुन आपुले राज्यशासन, नित भजतो सोनियाला
-------------------------------------------------------------------------------------------
मुळ गाणे -
जो आवडतो सर्वांला तोचि आवडे देवाला
कोणी, घास मुखीचा मुखी घालुनी
दुःख नेत्रीचे घेता पिउनी, फोडि पाझर पाषाणाला
घेउनि पंगु अपुल्या पाठी, आंधळ्याची होतो काठी
पायाखाली त्याच्यासाठी, देव अंथरी निज हृदयाला
जनसेवेचे बांधुन कंकण, त्रिभुवन सारे घेई जिंकुन
अर्पुन आपुले हृदसिंहासन, नित भजतो मानवतेला

Subscribe to:
Posts (Atom)
About Me
Labels
Blog Archive
हे ब्लॉग पाहिलेत का ?
म.प्र. लघुकथाकार परिषद पुरस्कार
डॉ श्रीराम ठाकुर दादा स्मृति संस्कारधानी सन्मान
बालसाहित्याच्या प्रांगणात
संवेदना
गरगर गिरकी
फुल पर्यांच्या गोष्टी भाग १
गोष्ट वादळ देवाची
चंद्र पालखीची वाट
कविता संग्रह
----------------------------
अनमोल बक्षीस
'तुका म्हणे' साहित्य पुरस्कार
आकाशवृक्षाचे फूल
द. म. साहित्य सभा, कोल्हापूर
1
त्रिधारा
संघर्ष
5
सांजधून
आम्हीही माणसचं
3
2
सौ. उज्ज्वला केळकर यांची काही प्रकाशीत पुस्तके
----